सोलापूर महापालिका व शिझियाझाँग शहरामध्ये भगिनी शहरे करार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

सोलापूर : तब्बल दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर महापालिका व चीनमधील शिझियाझाँग या दोन शहरामध्ये भगिनी शहरे करारावर शिक्कामोर्तब झाले. महापौर शोभा बनशेट्टी व शिझियाझाँग शहराचे महापौर डेन पेरीयन यांनी करारावर स्वाक्षरी केली.

सोलापूर : तब्बल दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर महापालिका व चीनमधील शिझियाझाँग या दोन शहरामध्ये भगिनी शहरे करारावर शिक्कामोर्तब झाले. महापौर शोभा बनशेट्टी व शिझियाझाँग शहराचे महापौर डेन पेरीयन यांनी करारावर स्वाक्षरी केली.

सोलापूर आणि शिझियाझुयँग या दोन शहरामध्ये 2005 साली भगिनी शहर करार संमत झालेला आहे. तथापि, यामध्ये फारशी प्रगती झालेली नव्हती. शिझियाझुयँग या शहरात 16 मे 2018 रोजी चीन व भारत या देशामध्ये करार झाला. येथील महापौरांनी सोलापूरातून वौद्यकीय व इतर शिक्षण घेण्यासाठी आपल्या शहरातून विद्यार्थी पाठवा, आम्ही त्यांना शिक्षण देऊ तसेच औद्योगिक विकासासाठी वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री व टेक्नॉलॉजी देणे आणि सोलापूरात त्यांच्या खर्चातून एखादे हॉस्पिटल दत्तक घेऊन त्याचा विकास करुन सेवा देता येईल याबद्दल परवानगी मागितली. 

एक महान चिकित्सक डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्यामुळे या दोन शहरांचे बंध जुळले आहेत. डॉ.कोटणीस यांनी त्यांचे जीवन मानवतेच्या सेवेसाठी वाहिले आहे. तथापि, त्यांनी केलेले कार्य आजही चीनमधील लोकांमध्ये जिवंत आहे  आणि चीनमधील लोक आणि चीन सरकारला डॉ.कोटणीस यांच्या मानवतावादी कार्याबद्दल नितांत आदर आहे.

सोलापूर आणि शिझियाझुयँग या दोन शहरामध्ये झालेल्या भगिनी करारानंतर या दोन शहरामधील माहितीचे आदान प्रदान होण्यासाठी शिझियाझुयँग शहराचे महापौर आणि आधिकारी यांना मी सोलापूर शहरात येण्याचे निमंत्रण दिले आहे आणि त्यांनी ते स्विकारले आहे. 

Web Title: Solapur Municipal Corporation and Shijiazhong City agreement done