सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक लाल फितीत 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 23 जून 2018

सोलापूर : सूचना व उपसूचना वेळेत न आल्याने महापालिका अंदाजपत्रकाचा ठराव अद्याप नगरसचिव कार्यालयातच आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडणार आहे. 

स्थायी समिती सभापती निवडीचा वाद न्यायप्रविष्ट झाल्याने अंदाजपत्रक सलग दुसऱ्या वर्षी उशीरा मांडले गेले. गेल्या वर्षी सत्ताधारी भाजपमधील गटबाजीमुळे ते ६ मे २०१७ ला सादर झाले होते. यंदा त्याहीपेक्षा एक महिना उशीरा म्हणजे  12 जून रोजी मांडण्यात आले. हे कमी की काय म्हणून सत्ताधारी व विरोधकाकडून  सूचना व उपसूचना वेळेत न आल्याने अंदाजपत्रकाची प्रत्यक्षातील अमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार आहे.

अंदाजपत्रकीय सभा झाल्यावर त्याची अंमलबजावणी  होण्यासाठी तो प्रशासनाकडे तातडीने पाठविणे आवश्‍यक असते. एक-दोन दिवसांच्या फरकाने ठराव प्रशासनाकडे जातोही. मात्र यंदा तब्बल दहा दिवसानंतरही ठराव नगरसचिव कार्यालयातच आहे. शुक्रवारी नगरसचिव कार्यालयीन कामासाठी मुंबईला गेले होते. आज  शनिवार आणि उद्या  (रविवारी) सुटी आहे.सोमवारी आयुक्त बैठकीनिमित्त मुंबईत आहेत. नगरसचिव कार्यालयातील  कामकाजाची आतापर्यंतचा अनुभव व  पध्दत पाहिली तर हा ठराव आयुक्तांकडे जाण्यास जुलै  उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरात दिवसाआड, तर हद्दवाढ भागात पाण्याच्या टाक्‍या व जलवाहिनी, वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण होईपर्यंत दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा या प्रमुख शिफारसीसह 1357 कोटी 49 लाखांचे अंदाजपत्रक सभागृहनेते संजय कोळी यांनी सादर केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्याच्या प्रमुख शिफारसीसह विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी उपसूचना मांडली होती. स्मारकास निधी देण्यास तयारी दर्शविल्याने अंदाजपत्रकात उपसूचना समाविष्ट करण्यात आली. मात्र कॉंग्रेस व त्यांच्या समर्थक पक्षांनी अंदाजपत्रक एकमताने करण्यास विरोध केला. त्यामुळे अखेर बहुमताने मंजुरी देण्यात आली. 

विरोधी पक्षनेते महेश कोठे बाहेरगावी गेल्याने उशीर झाला. दुरुस्त सूचना व उपसूचना एकत्रित करून अंदाजपत्रकीय ठराव काल  शुक्रवारी दुपारी नगरसचिव कार्यालयाकडे पाठविला आहे. 
- संजय कोळी, सभागृह नेता 

Web Title: solapur municipal corporation budget on delay