सोलापुरात राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का; जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

भारत नागणे
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सोलापूर जिल्हयातील अनेक नेते भाजप सेनेच्या वाटेवर असतानाच शरद पवारांचे विश्वासू माजी आमदार जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक साळुंखे यांनी ही आज आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिले आहेत.

पंढरपूर : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. साळुंखे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे.

सोलापूर जिल्हयातील अनेक नेते भाजप सेनेच्या वाटेवर असतानाच शरद पवारांचे विश्वासू माजी आमदार जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक साळुंखे यांनी ही आज आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिले आहेत.

अलीकडेच साळुंखे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले  आहे .सांगोला विधानसभची जागा शिवसेनेच्या वाटयाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून साळुंखे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur NCP district president Deepak Salunkhe resigned