सोलापुरात 200 टक्के पेरणी; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

तुरीचे क्षेत्र यंदा 120 टक्‍क्‍यांनी घटले
सोलापूर - जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्यांनी वेग घेतला असला तरी पाऊस नसल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 200 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी खरीप पिकांची कोळपणी सुरू केली आहे. मात्र, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

यंदाच्या वर्षी कृषी विभागाने खरीप हंगामासाठी 79 हजार 18 हेक्‍टर क्षेत्र निर्धारित केले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या लवकरच सुरू केल्या होत्या. पिकांची उगवणही चांगली झाली आहे. परंतु, पिकांना आता पावसाची गरज आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यंदा ही टक्केवारी 166 टक्के इतकी आहे. मागील वर्षी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने त्याचा परिणाम खरेदीवर झाला. शासनानेही मोठ्या प्रमाणात तूर खरेदी करून शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या सगळ्या कटकटीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदा तुरीच्या पेरणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

Web Title: solapur news 200 percent sowing