फसवणूक प्रकरणात अमोल सोनकवडेला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

सोलापूर : लक्ष्मी को-ऑप बॅंकेला एक कोटी 60 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणात स्वप्निल असोसिएटचा भागीदार अमोल जयप्रकाश सोनकवडे (रा. 7, पद्म नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याची तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

लक्ष्मी बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात एप्रिल 2016 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असून पोलिसांनी मंगळवारी रात्री खानापूर परिसरातून अमोल सोनकवडे यास अटक केली. या गुन्ह्यात स्वप्निल असोसिएटचा भागीदार दीपक नारायण सोनकवडे (वय 56, रा. भवानी पेठ, सोलापूर) यास अटक करण्यात आली असून, सोरेगावचा तत्कालीन तलाठी सिद्राम बाबूराव जाधव (रा. उत्तर कसबा, तरटी नाका पोलिस चौकीजवळ, सोलापूर) हा अद्याप फरार आहे. याबाबत दि लक्ष्मी को-ऑप. बॅंकेच्या पांजरापोळ शाखेचे व्यवस्थापक सुनिल विठ्ठल एकबोटे (रा. लक्ष्मी बॅंक कॉलनी, ज्ञानेश्‍वर रोड, जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: solapur news amol sonkade arrested