'एटीएस'कडून तरुणांच्या मन परिवर्तनासाठी यशस्वी प्रयत्न

एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी
एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी

एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची माहिती : सोलापुरात घेतली आढावा बैठक

सोलापूर : काळानुसार दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलत असून सर्वप्रकारच्या आव्हानांना लढा देण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक सक्षमपणे कार्यरत आहे. तरुण-तरुणींना दहशतवादी विचारांच्या प्रवाहात जाण्यापासून रोखण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. मन परिवर्तन करून त्यांना नोकरी, व्यवसायासाठीही मदत केली जात आहे. आजवर 86 हून अधिक तरुण-तरुणींना आम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी आज (सोमवार) सांगितले.

सोलापुरात अलीकडेच स्थापन करण्यात आलेल्या दहशतवाद विरोधी पथकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे प्रमुख कुलकर्णी हे सोलापुरात आले होते. त्यांनी पोलिस आयुक्त महादेव तांबडे आणि इतर अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोलापूर हे सीमेवरचे शहर असल्याने पोलिसांसोबतच दहशतवाद विरोधी पथकाला दक्ष राहावे लागते. आजवर घडलेल्या घटनांचा गोष्टींचा विचार करूनच सोलापुरात एटीएसचे युनिट स्थापन करण्यात आल्याचे सांगून श्री. कुलकर्णी म्हणाले, बंद खोलीत बसून संगणकाच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांना खतपाणी घातले जात आहे. धर्माच्या नावाने प्रवृत्त केले जात आहे. दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलत असताना आम्ही सायबर दहशतवादाच्या अनुषंगानेही दक्ष आहोत. शासनाने यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करून दिला आहे. अल्पसंख्याक स्तरातील तरुण-तरुणींच्या सबलीकरणासाठी शासन प्रयत्न करीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना मदत केली जात आहे. आजवर आम्ही 86 तरुण-तरुणींना दहशतवादी प्रवाहात जाण्यासाठी रोखले आहे. धर्मगुरू, कुटुंबातील सदस्य आणि मानसोपचार तज्ञांच्या मदतीने तरुणांचे मन परिवर्तन करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com