आज "वर्षा'वर बैठक; भाजप नगरसेवक मुंबईकडे 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 10 जानेवारी 2018

सोलापूर - महापालिकेतील गटबाजीवर तोडगा काढ्ण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता पुढाकार घेतला आहे. आज (बुधवार) रात्री ८ वाजता ते ' वर्षा'वर  नगरसेवकांचा तास घेणार आहेत. त्यासाठी सहकारमंत्री गटाच्या १६ नगरसेवकानी आज सकाळीच मुंबईकडे कूच केले. पालकमंत्री गटाच्या ३५ नगरसेवकांची भूमिका स्पष्ट झाली नाही.

सोलापूर - महापालिकेतील गटबाजीवर तोडगा काढ्ण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता पुढाकार घेतला आहे. आज (बुधवार) रात्री ८ वाजता ते ' वर्षा'वर  नगरसेवकांचा तास घेणार आहेत. त्यासाठी सहकारमंत्री गटाच्या १६ नगरसेवकानी आज सकाळीच मुंबईकडे कूच केले. पालकमंत्री गटाच्या ३५ नगरसेवकांची भूमिका स्पष्ट झाली नाही.

यापूर्वीच्या नियोजनानुसार मुख्यमंत्री फक्त दोन्ही मंत्री, महापालिकेतील पदाधिकारी व पक्ष पदाधिकारी यांची बैठक घेणार होते. मात्र सर्वच नगरसेवकाना बोलावण्यात आल्याने एखादा मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेचे  महेश कोठे यांच्याकडून भाजप प्रवेशाचे संकेत यापूर्वी मिळाले आहेत. तेही सध्या मुंबईत असून त्यानीही मुख्यमंत्र्याची वेळ घेतल्याचे सांगण्यात आले. श्री कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सोलापूर महापालिकेतील सर्व राजकीय समीकरणे बदलणार आहेत. नेमके काय होणार याबाबत आज रात्री होणाऱ्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

महापालिकेत सत्तांतर झाले आणि भाजपची सत्ता आली. मात्र, त्याचा काहीच फायदा सोलापूरकरांना झाला नाही. अंदाजपत्रकातील तरतुदी कागदावरच राहिल्या. प्रत्येक निर्णयात गटबाजीचे राजकारण होऊ लागल्याने एकही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे नागरिकांतून ओरड सुरू झालीच होती, पण पहिल्यांदाच निवडून आलेल्या भाजप नगरसेवकांतूनही नाराजी व्यक्त होऊ लागली. त्याची गांभीर्याने दखल प्रदेश समितीने घेतली आहे. 

या बैठकीला पालकमंत्री विजय देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांच्यासह शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्यासह सर्वच नगरसेवकाना अचानकपणे  निमंत्रित करण्यात आले आहे. कोणत्याही स्थितीत बैठकीस उपस्थित राहिलेच पाहिजे, असा निरोप दिला आहे.  बैठक टाळण्यासाठी कोणतीही कारणे सांगू नयेत, असेही बजावण्यात आले आहे. 

मत आजमाविण्याची शक्यता
श्री कोठे याना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा निर्णय घेण्यापुर्वी सर्व नगरसेवकांची मते आजमावून घ्यायची असतील असा अंदाज मुंबईकडे निघालेल्या एका नगरसेवकाने सकाळ ला सांगितले.

Web Title: solapur news BJP meeting on varsha bunglow