स्वच्छता मोहिमेतून 'स्वच्छ सोलापूर... स्मार्ट सोलापूर'चा नारा!

clean
clean

सोलापूर : स्वच्छ आणि सुंदर शहर ही सोलापूरची ओळख व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या "सकाळ'च्या वतीने रविवारी होम मैदानावर स्वच्छता मोहीम घेण्यात आली. गड्डा यात्रेत जागोजागी साचलेला कचरा उचलून विविध सामाजिक संस्था, संघटनांनी "स्वच्छ सोलापूर... स्मार्ट सोलापूर'चा नारा दिला. 

उपमहापौर शशिकला बत्तुल, महापालिकेचे उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला सुरवात करण्यात आली. स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, आरोग्य समितीचे सभापती संतोष भोसले, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, अमोल शिंदे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, फिरदोस पटेल, माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, राजकुमार पाटील, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय कांबळे, मुख्य सफाई अधीक्षक संजय जोगदनकर आदी उपस्थित होते. "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी प्रास्ताविक केले. युनिट मॅनेजर किसन दाडगे यांनी "सकाळ'च्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. 

लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी स्वत: हातात झाडू आणि कचरा गोळा करण्यासाठी पिशवी घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. होम मैदानावर भरलेल्या गड्डा यात्रेत अनेक स्टॉलसमोर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. संभाजी आरमार, लायन्स क्‍लब, यशदा फाउंडेशन, सर फाउंडेशन, इको फ्रेंडली क्‍लब यासह अनेक संस्था, संघटनांनी उत्स्फूर्तपणे होम मैदानावर स्वच्छता करत "स्वच्छ सोलापूर... स्मार्ट सोलापूर'चा नारा दिला. गोळा केलेला कचरा घंटागाडीमध्ये टाकण्यात आला. 

यांचा होता सहभाग... 
संभाजी आरमारचे जिल्हा संघटक अनंत नीळ, सुधाकर करणकोट, संजय सरवदे, राज दवेवाले, संताजी जांभळे, विठ्ठल वाघमोडे, मनोज जाधव, सोमनाथ मस्के, गिरीश जवळकर, व्यंकटेश म्याकल, युवराज हिंगमिरे, करण कोळेकर, समर्थ माने, स्वप्नील वाघमारे, प्रवीण मोरे, बालाजी जगदाळे, लायन्स क्‍लब सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष रकीब खान, सचिवा प्रतिभा जाधव, अजित महाजन, महबूब शेख, राजेंद्र लिंबीतोटे, किरण कुलकर्णी, डॉ. चंद्रमोहन इंदापुरे, दीपक भादुले, अतुल कुलकर्णी, रियाज भाईजान, ऍड. लक्ष्मण मारडकर, ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी, निसर्गप्रेमी संघटनेच्या ऍड. सरोज बच्चुवार, अंजली कुर्डूकर, शांता येळमकर, ममता बोलाबत्तीन, गौरी आमडेकर, सुरेश नकाते, निदीश नकाते, सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण, सर फाउंडेशनचे बाळासाहेब वाघ, सिद्धाराम माशाळ, रेवणसिद्ध मायनाळे, सिद्धाराम अडगळे, परवेझ शेख, इको फ्रेंडली क्‍लबचे संजीवकुमार कलशेट्टी, जय फाउंडेशनचे आसिफ यत्नाळ, कय्युम शिर्के यांच्यासह आशा सोलापुरे, स्वाती आवारे, मनीषा उडाणशिव, उषा कसबे, मुमताज सय्यद, अंजुम शेख, आफ्रिन पठाण, रुकसाना मुजाहिदीन, हमिदा पठाण, संगीता कांबळे, सृष्टी कांबळे. 

स्वच्छता मोहिमेचा उपक्रम प्रशंसनीय आहे. गेल्या तीन वर्षांपासून "सकाळ'च्या वतीने होम मैदानावर गड्डा यात्रेत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांना महापालिका कायमच सहकार्य करत राहील. 
- शशिकला बत्तुल, उपमहापौर 

सोलापूर शहर स्मार्ट सिटी व्हावे यासाठी "सकाळ' विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहे. प्रदूषणमुक्त संभाजी तलाव अभियानामुळे तलाव परिसरातील ड्रेनेजचे पाणी तलावात सोडणे बंद झाले. गड्डा यात्रेतील स्वच्छतेमुळे चांगली जनजागृती होईल. 
- त्र्यंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त 

"सकाळ' नेहमीच स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने उपक्रम राबवीत आहे. स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच जनजागृती होईल. प्लास्टिक निर्मूलनाबाबत लोकांमध्ये अधिक प्रबोधनाची गरज आहे. 
- आनंद चंदनशिवे, बसप, नगरसेवक 

गड्डा यात्रेत दरवर्षी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवून "सकाळ'ने एक आदर्श निर्माण केला आहे. "स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर'चा नारा सत्यात उतरविण्यासाठी "सकाळ' प्रयत्न करीत आहे. यातून नक्कीच सकारात्मक चित्र दिसून येईल. 
- चेतन नरोटे, कॉंग्रेस गटनेते 

होम मैदानचा परिसर माझ्या प्रभागात आहे. "सकाळ'च्या वतीने स्वच्छ आणि सुंदर सोलापूरसाठी प्रयत्न होत आहेत. नागरिकांनी आपला परिसर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहावीत याची दक्षता घ्यायला हवी. 
- श्रीदेवी फुलारे, नगरसेविका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com