फसवणूक झाल्यावर फिर्याद देण्यास नको टाळाटाळ 

परशुराम कोकणे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

सोलापूर - ऑनलाइन विश्‍वात फक्त अशिक्षित मंडळीच फसतात असे नाही तर डॉक्‍टर, वकील, बॅंक अधिकारी, व्यावसायिक यासारखे उच्च शिक्षित लोकही सहज फसतात. फसवणूक, बॅंक खात्यातून पैशांची चोरी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी होऊनही आपली फसवणूक झाली हे इतरांना कळू नये, यासाठी अनेकजण सायबर सेल विभागाच्या पोलिसांकडे फिर्याद देण्यास टाळाटाळ करत असल्याचे सध्याचे चित्र आहे. 

सोलापूर - ऑनलाइन विश्‍वात फक्त अशिक्षित मंडळीच फसतात असे नाही तर डॉक्‍टर, वकील, बॅंक अधिकारी, व्यावसायिक यासारखे उच्च शिक्षित लोकही सहज फसतात. फसवणूक, बॅंक खात्यातून पैशांची चोरी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी होऊनही आपली फसवणूक झाली हे इतरांना कळू नये, यासाठी अनेकजण सायबर सेल विभागाच्या पोलिसांकडे फिर्याद देण्यास टाळाटाळ करत असल्याचे सध्याचे चित्र आहे. 

मी बॅंकेतून बोलतोय, तुमचे एटीएम कार्ड बंद होणार आहे. असे फोन आपल्यापैकी अनेकांना आले असतील. ऑनलाइन माध्यमातून लोकांची फसवणूक करणाऱ्यांनी आता त्यांची स्टाइल बदलली आहे. माझे पैसे चुकून तुमच्या खात्यात आले आहेत, असे सांगून संवाद साधला जातोय. आपल्या बॅंक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती देणारा एक खोटा मेसेजही केला जातो. चुकून तुमच्या खात्यात आलेले पैसे परत घेण्यासाठी बॅंक खात्याची माहिती विचारली जाते. बोलण्यात गुंतवून सर्व माहिती घेतली जात आहे. कामानिमित्त कुठेतरी दिलेल्या आधार कार्ड झेरॉक्‍सच्या माध्यमातून माहिती चोरून लोकांना फोन केले जात आहेत. आधार कार्डचे सुरवातीचे चार आणि शेवटचे चार आकडे सांगितले जातात. बॅंक खात्याची माहिती विचारून फसविले जात आहे. 

मुंबई, पुण्यात तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. तेथील नागरिक फसवणूक झाली असेल तर बिनधास्त तक्रार करतात, पण सोलापुरात मात्र अशा तक्रारींचे प्रमाण कमी आहे. ऑनलाइन माध्यमातून एखाद्याची फसवणूक झाली असेल त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करावी. शाळा, महाविद्यालयांत जाऊन सायबर पोलिस ठाण्याची टीम जनजागृती करत आहे, असे सायबर पोलिस ठाण्याच्या प्रमुख, पोलिस उपनिरीक्षक मधुरा भास्कर यांनी सांगितले. 

आता सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या गुन्हेगारीला तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच आळा घालण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. भविष्यात सायबर क्राइमचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. 
- मधुरा भास्कर, 

पोलिस उपनिरीक्षक, शहर सायबर पोलिस ठाणे

90 हजारांचे गॅझेट, 30 हजाराला 
शहरातील एका हाय प्रोफाइल मुलास गॅझेट खरेदीसाठी व्हाॅट्सअॅपवर मेसेज आला. गॅझेटची मूळ किंमत नव्वद हजार रुपये होती. ते गॅझेट तीस हजारांत देतो असा मेसेज त्याला व्हॉट्‌सअॅपवर आला. आमिष दाखवून खात्यात पैसे भरण्यास लावले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून खात्यात पैसे भरण्यासाठी सांगण्यात आले. या घटनेत जवळपास सात-आठ लाख रुपयांची फसवणूक झाली. या घटनेनंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली, पण आपली झालेली फसवणूक इतरांना कळेल यासाठी तिने फिर्याद दिली नाही. असे प्रकार वाढले आहेत.

 

Web Title: Solapur News cyber fraud info special