भाजपमधील गटबाजीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल 

भाजपमधील गटबाजीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल 

सोलापूर  महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये दहा महिन्यापासून  सुरू असलेल्या गटबाजीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर गंभीर दखल घेतली आहे. याबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी बुधवारी (ता. 10) वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे. 

महापालिकेत सत्तांतर झाले आणि भाजपची सत्ता आली. मात्र, त्याचा काहीच फायदा सोलापूरकरांना झाला नाही. अंदाजपत्रकातील तरतुदी कागदावरच राहिल्या. प्रत्येक निर्णयात गटबाजीचे राजकारण होऊ लागल्याने एकही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे नागरिकांतून ओरड सुरू झालीच होती, पण पहिल्यांदाच निवडून आलेल्या भाजप नगरसेवकांतूनही नाराजी व्यक्त होऊ लागली. त्याची गांभीर्याने दखल प्रदेश समितीने घेतली आहे. 

या बैठकीला पालकमंत्री विजय देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांच्यासह शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कोणत्याही स्थितीत बैठकीस उपस्थित राहिलेच पाहिजे, असा निरोप प्रदेश कार्यालयातून पाठविण्यात आला आहे. बैठक टाळण्यासाठी कोणतीही कारणे सांगू नयेत, असेही बजावण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत पदाधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्री आणि प्रदेश पातळीवरील नेते काय भूमिका घेतात, हे बुधवारी सकाळी स्पष्ट होणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावल्याचा निरोप प्रदेश संघटक रघुनाथ कुलकर्णी यांच्याकडून मिळाला. त्यानुसार या बैठकीला आम्ही जाणार आहोत. 
- संजय कोळी, सभापती महापालिका स्थायी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com