शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या लेखापालास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

सोलापूर - वखार महामंडळानी नाकारलेली तूर चाळणी केल्यानंतर परत घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल आणि नाफेड प्रतवारीकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. 29) अटक केली.

राजशेखर श्रीमंत मुळे (वय 55, रा. अक्कलकोट) आणि विनायक अंबादास जाधव (वय 29, रा. मु.पो. किणी, ता. अक्कलकोट) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार शेतकऱ्याने 26 मार्च 2018 रोजी तुरीची 64 पाकिटे अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शासनाच्या हमीभाव केंद्रात विक्रीसाठी दिली होती. त्यावळी वखार महामंडळाने खराब असल्याचे कारण सांगून परत पाठवलेली 31 पाकिटे तूर चाळणी करून पुन्हा वखार महामंडळाने जमा करून घेण्यासाठी लेखापाल मुळे याने अडीच हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना प्रतवारीकार जाधवसह दोघांना अटक केली.

Web Title: solapur news farmer bribe Accountant arrested