थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी नवी वीजबिले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

सोलापूर - राज्यातील कृषिपंपांची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणकडून 1 नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीजबिले देण्यात येत आहेत. त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्त्यात भरावयाची याची माहिती दिली आहे. 

बिलाच्या डाव्या बाजूस 15 नोव्हेंबरपूर्वी शेतकऱ्यांनी किती रक्कम भरायची आहे, याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 पर्यंत पाच हप्त्यात किती रक्कम भरावी लागणार आहे, हेही नमूद आहे. या शिवाय चौकटीत जूनचे बिल या अगोदर वितरित करण्यात आले असून, हे देयक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 अंतर्गत सहभागी होण्यासाठी तसेच, थकीत रकमेचे सुलभ हप्ते माहीत होण्यासाठी दिले आहे. 

या बिलात 30 हजार रुपयांच्या आत थकबाकी असणाऱ्या ग्राहकांना पाच, तर 30 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना दहा सुलभ हप्ते मिळणार आहेत. थकबाकीचे हप्ते नियमित भरणाऱ्यांना नेमका किती दंड आणि व्याज माफ करायचे, याचा शासनाकडून विचार करण्यात येईल, याचाही आकडा नमूद आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

Web Title: solapur news farmer electricity bill