'आदर्श नुडीसिरी' कन्नड उत्सव कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ

राजशेखर चौधरी
रविवार, 11 मार्च 2018

आज सकाळी ११ वाजता एवन चौकातील हुतात्मा स्मारकापासून भुवनेश्वरी देवीचा प्रतिमेच्या पूजन आबा चीक्कमणूर आणि लक्ष्मण समाणे यांचा हस्ते करून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध कलासंघा बरोबर मिरवणूक व ग्रंथदिंडी निघाली आहे.त्यानंतर एका तासाभराने माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांचा हस्ते उद्घाटन होणार आहे

अक्कलकोट -  आदर्श कन्नड बळग महाराष्ट्र आणि गडी अभिवृद्धी प्राधिकार बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज ता. ११ व  उद्या १२ मार्च  रोजी अक्कलकोट येथील एवन चौकातील टेनि  स कोर्ट मैदानावर  आदर्श नुडीसिरी कन्नड उत्सव कार्यक्रम आयोजित कार्यक्रमास कन्नड लोककला सदरकरणासह भुवनेश्वरी देवीचा प्रतिमेच्या मिरवणुकीने प्रारंभ झाला असून  यात कार्यक्रमाचे सर्वाध्याक्षा म्हणून डॉ.मधुमाल लिगाडे,कन्नड चित्रपट कलाकार रुपेश तिम्माजी,पंचाक्षरी स्वामी आणि हास्य कलाकार रवी बजंत्री आदी सहभागी झाले आहेत.

तत्पूर्वी आज सकाळी ११ वाजता एवन चौकातील हुतात्मा स्मारकापासून भुवनेश्वरी देवीचा प्रतिमेच्या पूजन आबा चीक्कमणूर आणि लक्ष्मण समाणे यांचा हस्ते करून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध कलासंघा बरोबर मिरवणूक व ग्रंथदिंडी निघाली आहे.त्यानंतर एका तासाभराने माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांचा हस्ते उद्घाटन होणार आहे. दोन दिवशीय कार्यक्रमात सिने सृष्टीतील उदयोन्मुख सिने अभिनेते,टीव्ही कलाकार,हास्य कलाकार,संगीत संध्या ,विश्वमानव पुरस्कार,आदर्श महिळा रत्न पुरस्कार,विविध विषयावर संवाद गोष्ठी,कविगोष्ठी समवेत मनोरंजन कार्यक्रम  होणार आहेत. मुख्य प्रवेश द्वाराचे उद्घाटन जन्मेंजय भोसले यांच्या हस्ते होणार आहे.त्याच ठिकाणी संमेलन ध्वजारोहण आणि राष्ट्रध्वजारोहण  सभापती सुरेखा काटगांव व पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचा हस्ते होणार आहे.दोन दिवशीय मुख्य कार्यक्रमाचे सर्वाध्याक्षा म्हणून डॉ.मधुमाल लिगाडे उपस्थित राहणार आहे.

उद्घाटन समारंभाचे दिव्य्सानिध्य श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी व बसवलिंग महास्वामीजी भूषविणार आहे.अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे असणार आहेत.या वेळी कन्नड अभिवृद्धी प्राधीकाराचे अध्यक्ष बाबुराव चिंचनसूर प्रतिमापूजन ,दीपप्रज्वलन माजी आमदार सिद्रामप्पा पाटील करणार आहे.आळंद चे आमदार बी.आर.पाटील यांच्या हस्ते विश्वमानव पुरस्कार देण्यात येणार आहे.प्रमुख अतिथी म्हणून शिवानंद पाटील, मल्लिकार्जुन पाटील, प्रकाश हिप्परगी,महेश इंगळे,अशपाक बाळोरगी ,मल्लिनाथ भासगी,राजकुमार लकाबशेट्टी,महादेव बेळळे ,प्रदीप ठेंगील,मल्लिनाथ स्वामी,रतिलाल भुसे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.यावेळी विश्वमानव पुरस्कार पुरस्कृत   : रुपेश तिम्माजी,पंचाक्षरी स्वामी,श्रीमती शकुंतला तानवडे ,नंदी हुवीनहोळे ,राजशेखर उंबराणीकर,,काशिनाथ भतगुणकी,सिद्धाराम काळे,धरेप्पा तोळणूरे,प्रकाश उणणद,किरण पाटील आदींना तर आदर्श महिळा रत्न पुरस्कार पुरस्कृत : रूपा कणमुसे ,मल्लम्मा पसारे,अक्षता देशपांडे,राजश्री  थलंगे आदींना देण्यात येणार आहे.तसेच ११ तारखेला  कर्नाटक मधील प्रसिद्ध हास्यकलाकार रवी बजंत्री व १२ तारखेला इंदुमती सालीमठ यांचे हास्य कार्यक्रम होणार आहे. तसेच झी कन्नड वाहिनीवरील सारेगम लिटल चाम्प सिझन १२ चे गायिका भूमिका आणि ओम करोके शो संगीत कार्यक्रमातील सर्व कलाकाराकडून संगीत संध्या कार्यक्रम संपन्न होणार आहे.आकांक्षा पुराणिक यांच्या कडून भरत नाट्य सादर होणार आहे. तसेच दोन्ही राज्यातील विविध विषयावर संवाद गोष्टी संपन्न होणार आहे. समस्त तालुकावासियानी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आदर्श कन्नड बळग महाराष्ट्रचे अध्यक्ष मलिकजान शेख यांनी केले आहे.

Web Title: solapur news festival western maharashtra