सरकारचे संकेतस्थळ तांत्रिक अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

शासन निर्णयाचे दुसरे पान उघडत नाही
सोलापूर - सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी सरकारचे "महाराष्ट्र शासन' हे संकेतस्थळ आहे; मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून हे संकेतस्थळ तांत्रिक अडचणीने ग्रासल्याचे दिसून येते. संकेतस्थळावरील सरकारी निर्णयाचे दुसरे पान उघडतच नसल्याचे स्पष्ट होत आहे.

"महाराष्ट्र शासन' हे संकेतस्थळ सुरू केल्यानंतर आलेल्या मुखपृष्ठावर वेगवेगळ्या विभागांची माहिती आहे. त्यामध्ये शासन निर्णय नावाची लिंक आहे. त्या लिंकवर गेल्यानंतर ती सुरू होते. त्या लिंकचे पहिले पान व्यवस्थितपणे दिसते; मात्र दुसऱ्या पानावर क्‍लिक केली असता दुसरे पान सुरूच होत नाही. त्याचबरोबर शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या विभागांसाठी स्वतंत्र लिंक आहेत. त्या लिंकवर जाऊन एखादा विभाग सिलेक्‍ट केला, तरी तो विभागही सुरू होत नाही. त्याचबरोबर दुसरे पानही सुरू होत नाही. दोन-तीन दिवसांपासून सातत्याने ही तांत्रिक अडचण सुरू झाली आहे. या तांत्रिक अडचणीमुळे शासनाने घेतलेले निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाहता येत नाहीत.

Web Title: solapur news government website technical problem