बार्शीत १५ लाख रुपयांचा गुटखा पकडला

सुदर्शन हांडे
रविवार, 24 सप्टेंबर 2017

एवढ्या मोठया प्रमाणावर गुटखा पकडण्यात आल्या नंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागास कळवले आहे. या प्रकरणातील जप्त केलेला सर्व गुठका पंचनामा करून नष्ट करण्यात येणार असल्याचे व अन्न सुरक्षा व मानदे चे कलाम ५६ प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी एन टी मुजावर यांनी सांगितले.

बार्शी : येथील औद्योगिक वसाहत क्रमान दोन मधील गाळा क्रमांक दोन मध्ये छापा टाकत १५ लाख, तीन हजार आठशे दहा रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सागर दिलीप शिंदे यास ताब्यात घेण्यात आले आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारी औघोगिक वसाहत येथे मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची महिती मिळाली होती. या नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे व पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी मिटके, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग बोडणपोड, पोलीस उपनिरीक्षक संदीप मोटे, सहदेव देवकर, अभय उंदरे, अशपाक शेख, महेश बचुटे यांनी छापा टाकत गुटका जप्त केला. बार्शी शहर व परिसरात अवैधरित्या विकण्यासाठी हा साठ करण्यात आला होता. या प्रकरणी सागर दिलीप शिंदे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

एवढ्या मोठया प्रमाणावर गुटखा पकडण्यात आल्या नंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागास कळवले आहे. या प्रकरणातील जप्त केलेला सर्व गुठका पंचनामा करून नष्ट करण्यात येणार असल्याचे व अन्न सुरक्षा व मानदे चे कलाम ५६ प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी एन टी मुजावर यांनी सांगितले. बार्शीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडूनही केवळ एकावर कारवाई करण्यात आली. एवढा मोठया प्रमाणात असलेला माल हा मोठ्या हस्तीचा असल्याचे बोलले जात आहे. या घटनेच्या तपासाची व्याप्ती वाढवून गुटखा रॅकेट पकडता आले असते पण काही मोठ्या माशांवरील कारवाई टाळण्यासाठी एकावर कारवाई करून प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाकडे देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: Solapur news Gutkha seized in Barshi