हॉटेल त्रिपुरसुंदरीचा बॅंक ऑफ इंडियाने घेतला ताबा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

सोलापूर - सोलापुरातील हॉटेल त्रिपुरसुंदरीकडे मार्च 2015 पासून 25 कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकल्याने बॅंक ऑफ इंडियाच्या वतीने आज हॉटेलचा ताबा घेण्याची कारवाई करण्यात आली. "सरफेसी' कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जुलैमध्येच या बॅंकेला परवानगी दिली होती. यानुसार बॅंकेने आज दहा खोल्या ताब्यात घेण्याची कारवाई केली असल्याची माहिती झोनल मॅनेजर शशिकांत भावसार यांनी दिली. 

हॉटेल त्रिपुरसुंदरीने घेतलेल्या कर्जापोटी हॉटेल व हॉटेलची जागा तारण ठेवण्यात आली आहे. हॉटेलकडून कर्ज व व्याजाची परतफेड होत नसल्याने बॅंकेने वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे "सरफेसी' कायद्यानुसार कारवाईची परवानगी मागितली होती. आज दुपारच्या सुमारास बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेलचा ताबा घेण्यास सुरवात केली. सायंकाळपर्यंत दहा खोल्यांचा ताबा घेण्यात आला आहे. सायंकाळी कारवाई करता येत नसल्याने येत्या दोन दिवसांमध्ये हॉटेलचा पूर्ण ताबा घेतला जाणार असल्याचेही झोनल मॅनेजर भावसार यांनी सांगितले.

Web Title: solapur news hotel bank of india