सोलापूरहून यकृत पुण्याकडे रवाना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

सोलापूर - "आयआरबी' कंपनीमधील लॅब टेक्‍निशियन प्रकाश काशिनाथ भागवत (वय 54) यांचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाला. त्यांचे एक नातेवाईक मेघनाथ जैतापकर यांनी भागवत यांच्या यकृत दान करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर भागवत यांचे यकृत काढून पुण्यातील आदित्य बिर्ला रुग्णालयात पाठविण्यात आले. यासाठी पोलिसांच्या मदतीने "ग्रीन कॉरिडॉर'ची व्यवस्था करण्यात आली होती.

प्रकाश भागवत हे मूळचे ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील आहेत.

त्यांच्या मेंदूच्या अर्ध्या भागाला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नव्हता. म्हणून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. यशोधरा रुग्णालयामध्ये सोमवारी (ता.12) उपचार सुरू असताना त्यांचा मेंदू मृत झाला. रात्री 12 वाजता त्यांचा मेंदू मृत झाल्याची घोषणा डॉ. आषिष भुतडा, डॉ. शेहरोज बॉम्बेवाले यांनी केली.

"झोनल ट्रान्सप्लॅट कोऑर्डिनेशन' केंद्राच्या सल्ल्यानुसार (झेडटीसीसी) त्यांचे यकृत पुण्याला पाठविण्यात आले. भागवत यांचे हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये हृदय घेणारा उपलब्ध नसल्याने चेन्नई येथील रुग्णालयाला कळविण्यात आले होते.

मात्र सोलापूरपासून चैन्नई दूर असल्याने व कमी वेळेत तिथे हृदय पोचविणे अशक्‍य असल्याने हृदय प्रत्यारोपण करण्यात आले नाही.
भागवत यांचे मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यांच्या मूत्रपिंडाची गाळणक्षमता कमी असल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णास भागवत यांचे डोळे दान करण्यात आले आहेत.

Web Title: solapur news liver donate