सोलापूरमध्ये वीजबिल भरणा केंद्रे सुटीतही राहणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

सोलापूर - थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या काळातही सुरू राहतील. त्यामुळे ग्राहकांना 24 ते 26 या सुटीच्या दिवशीही वीज बिलाचा भरणा करता येणार आहे.

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे थकीत देयकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी शनिवारी (ता. 24) रविवारी (ता. 25) व सोमवारी (ता. 26) सार्वजनिक सुटी असली तरी जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. याशिवाय चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच मोबाईल ऍपद्वारे "ऑनलाइन' सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: solapur news marathi news breaking news electricity bill