ठाण्याच्या पाहुण्यांचे दागिने पोलिसांमुळे मिळाले परत! 

परशुराम कोकणे
सोमवार, 29 जानेवारी 2018

चंद्रभागा वामन खरात (वय 60), वामन खरात (वय 65, रा. ठाणे) हे दोघे सोलापुरात नातवाच्या लग्नासाठी एक दिवस आधीच सोलापुरात आले होते. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर लग्नाच्या ठिकाणी कुमठा नाका येथे जाण्यासाठी सम्राट चौक येथून रिक्षा पकडली. ते लग्नस्थळाच्या ठिकाणी पोचले. काही वेळातच त्यांना सोन्याचे दागिने असलेले बॅग नसल्याचे लक्ष्यात आले.

सोलापूर : ठाण्याहून सोलापुरात लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांचे 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने व इतर ऐवज असलेली बॅग रिक्षात राहिली होती. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भीमसेन जाधव आणि त्यांच्या पथकाने काही तासात सोन्याचे दागिने व इतर ऐवजाचा शोध घेऊन पाहुण्यांना सन्मानपूर्वक परत दिले. 

चंद्रभागा वामन खरात (वय 60), वामन खरात (वय 65, रा. ठाणे) हे दोघे सोलापुरात नातवाच्या लग्नासाठी एक दिवस आधीच सोलापुरात आले होते. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर लग्नाच्या ठिकाणी कुमठा नाका येथे जाण्यासाठी सम्राट चौक येथून रिक्षा पकडली. ते लग्नस्थळाच्या ठिकाणी पोचले. काही वेळातच त्यांना सोन्याचे दागिने असलेले बॅग नसल्याचे लक्ष्यात आले. रिक्षा चालकांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. शेवटी त्यांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठून रिक्षामध्ये बॅग विसरल्याचे सांगितले. तसेच गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भीमसेन जाधव यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी गुन्हे शाखेच्या पथकालाही रिक्षा चालकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. 

खरात कुंटूबीय ज्या मार्गाने रिक्षातून गेले होते त्या मार्गामधील सर्व सिसिटिव्ही फुटेजची पाहणी केली. एका सिसिटिव्ही फुटेजमध्ये ठाणेकर रिक्षामधून जाताना दिसले मात्र त्या रिक्षाचा क्रमांक स्पस्ट दिसत नव्हता. पोलिस उपनिरीक्षक जाधव यांनी कयास लावून दोन नंबर आरटीओ कार्यालयाकडे देवून त्यांची माहिती घेतली. आरटीओकडून मिळालेल्या पत्त्याच्या आधारे त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे कर्मचारी पाठविले. गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार संजय पवार, नीलकंठ तोटदार, आप्पा पवार, बाबर कोतवाल, उमेश सावंत, पापडे, उडानशिवे हेही बॅग शोधत होते. 

रिक्षा चालक भोगाव येथे मिळून आला. पोलिस पोचताच रिक्षाचालकाने रिक्षात विसरलेली बॅग पोलिसांकडे दिली. पोलिस पथकाने रिक्षा चालक व सोन्याचे दागिने पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, पोलिस उपनिरीक्षक भीमसेन जाधव यांच्यासमोर हजर केले. खरात कुंटूबीयांना बोलावून घेऊन सोन्याचे दागिने व बॅग पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चंद्रभागा खरात यांच्याकडे सर्पुद केली. पोलिसांनी केलेल्या प्रयत्नामुळे बॅग परत मिळाल्याची कृतज्ञता व्यक्त करून सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे त्यांनी आभार मानले.

Web Title: Solapur news marriage ceremony jewelry thief