सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात 'स्किल सेंटर'ची उभारणी करणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

सोलापूर - "इमर्जन्सी लाइफ सपोर्ट'ची गरज असताना तातडीने करावयाच्या कृतीबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी येथील डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजमध्ये "स्किल सेंटर'ची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाने पाहणी केली असून, लवकरच त्याची कार्यवाही सुरू होईल, अशी महिती अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी दिली. 'हे केंद्र उभारल्यानंतर जिल्ह्यातील सर्व डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे केंद्र उभारणीसाठी दीड कोटी आणि त्यातील यंत्रसामग्रीसाठी दीड कोटी रुपये, तर प्रशिक्षणासाठी 25 लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात एक कोटी 18 लाख रुपये उपलब्ध होणार आहेत,'' अशी माहिती डॉ. घाटे यांनी दिली.

गोव्याच्या धर्तीवर अत्याधुनिक सुविधायुक्त शवचिकित्सालय उभारण्यात येणार असल्याचे डॉ. सतीन मेश्राम यांनी सांगतिले.

Web Title: solapur news medical college skill center