सोलापूर जिल्हा दूध संघाचा दूध संकलन बंदचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

सोलापूर - जिल्हा दूध संघाकडे असलेल्या अतिरिक्त दुधाची खरेदी सरकारने योग्य दरात करावी. सरकारने ते न केल्यास जिल्हा दूध संघाला एकवेळचे दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

परिचारक म्हणाले, की सरकारने निश्‍चित केलेला 27 रुपये प्रतिलिटर इतका खरेदीदर संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जात आहे; मात्र खासगी दूध संघाकडून 22 रुपये प्रतिलिटरप्रमाणे दुधाची खरेदी होत आहे. जिल्हा दूध संघाला प्रतिलिटर पाच रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघाकडे अतिरिक्त होणारे दूध सरकारने योग्य दरात खरेदी करावे, याबाबतचे पत्र दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना दिले आहे.

जिल्हा दूध संघ दररोज एक लाख 10 हजार लिटर दुधाचे संकलन करतो. त्यापैकी जवळपास 50 हजार लिटर दुधाचे पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते. उर्वरित शिल्लक राहिलेले अतिरिक्त दूध खूपच कमी किमतीने विकावे लागते. जिल्हा दूध संघाकडे अतिरिक्त झालेले दूध सरकारने खरेदी केल्याशिवाय आता पर्याय शिल्लक राहिलेला नाही, अशी अपेक्षा परिचारक यांनी व्यक्त केली.

Web Title: solapur news milk collection close warning