पक्षाने सांगितले तर इमारतीवरुनही उडी मारेन: खासदार अमर साबळे

विजयकुमार सोनवणे
रविवार, 28 जानेवारी 2018

लोकमंगल समुहातर्फे आयोजिलेल्या कार्यक्रमासाठी साबळे काल सोलापुरात आले होते. सोलापूर लोकसभेसाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. त्या संदर्भात त्याना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

सोलापूर : भारतीय जनता पक्षाने मला सांगितले तर मी ईमारतीवरुनही उडी मारेन असे पिंपरीतील भाजपचे खासदार अमर साबळे यांनी सांगितले.

लोकमंगल समुहातर्फे आयोजिलेल्या कार्यक्रमासाठी साबळे काल सोलापुरात आले होते. सोलापूर लोकसभेसाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. त्या संदर्भात त्याना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

श्री साबळे म्हणाले, "पक्षाने मला सांगितले की या डोहात, या विहरीत किंवा या विहरीत उडी मार, तर मी क्षणाचाही विलंब न करता उडी मारेन. भाजपवर श्रद्धा असणारा मी कार्यकर्ता आहे. भाजप माझ्यासाठी आई-वडिलांप्रमाणे आहे त्यामुळे पक्ष जो आदेश देइल तो मी पाळेन." 

सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीची  मागणी नाही, माझा आग्रहही नाही व मी तसा प्रयत्नही करणार  नाही, असे सांगून श्री साबळे म्ह णाले ," भाजपने मला न मागता खुप काही दिले आहे. २००९ची आमदारकीची उमेदवारी ; २०१४ लाही दिली. तांत्रिक कारणामुळे ती पुर्ण झाली नाही. खासदारकीची उमेदवारीही न मागता दिली. मागितल्यानंतर देणारा हा माणूस असतो व न मागता देणारा हा देव असतो. त्यामुळे भाजपचे माझ्या मनात देवाचे स्थान आहे. कोणताही निर्णय घ्यायचे अधिकार हे श्रेष्ठीना आहेत. त्यामुळे पक्षाची गरज म्हणून किंवा पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी श्रेष्ठी जो आदेश देतील तो मान्य असेल."

Web Title: Solapur news MP Amar Sable BJP