नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल नाही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

सोलापूर - सीबीएसईतर्फे 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूपात कोणताही बदल करण्यात येणार नाही. मागील वर्षी (2017) घेण्यात आलेल्या नीट परीक्षेसारखेच या परीक्षेचे स्वरूप असणार आहे. सीबीएसईने संकेतस्थळावर याबाबतचे स्पष्टीकरण केले आहे. मागील काही दिवसांपासून नीट परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात असल्याची पोस्ट सोशल मीडियावरून फिरत होती; तसेच शैक्षणिक वर्तुळातदेखील याबाबत चर्चा करण्यात येत होती. परीक्षा तोंडावर येत असताना शासन नीट परीक्षेच्या स्वरूपात कशी काय बदल करू शकते, असे अनेक प्रश्‍न पालक; तसेच विद्यार्थ्यांकडून समोर येत होते.

सोलापूर - सीबीएसईतर्फे 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूपात कोणताही बदल करण्यात येणार नाही. मागील वर्षी (2017) घेण्यात आलेल्या नीट परीक्षेसारखेच या परीक्षेचे स्वरूप असणार आहे. सीबीएसईने संकेतस्थळावर याबाबतचे स्पष्टीकरण केले आहे. मागील काही दिवसांपासून नीट परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात असल्याची पोस्ट सोशल मीडियावरून फिरत होती; तसेच शैक्षणिक वर्तुळातदेखील याबाबत चर्चा करण्यात येत होती. परीक्षा तोंडावर येत असताना शासन नीट परीक्षेच्या स्वरूपात कशी काय बदल करू शकते, असे अनेक प्रश्‍न पालक; तसेच विद्यार्थ्यांकडून समोर येत होते. याची दखल घेऊन सीबीएसईने नीट परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम हा मागील वर्षाप्रमाणेच असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

Web Title: solapur news NEET 2018 CBSE NEET 2018 examinations syllabus

टॅग्स