फळबागेसाठी लवकरच नवी योजना 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

सोलापूर - राज्यातील पाच हेक्‍टरहून अधिक शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारद्वारे फळबाग लागवडीची नवी योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच या योजनेला राज्यात प्रारंभ होणार आहे. 

सोलापूर - राज्यातील पाच हेक्‍टरहून अधिक शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारद्वारे फळबाग लागवडीची नवी योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच या योजनेला राज्यात प्रारंभ होणार आहे. 

राज्यातील फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढावे या हेतूने राज्य सरकारने पाच हेक्‍टरवरील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र योजना राबविण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तबही करण्यात आले. या योजनेनुसार शेतकऱ्यांना तीन टप्प्यात अनुदान दिले जाणार असून त्यामध्ये पहिल्या वर्षी 50 टक्‍के तर दुसऱ्या वर्षी 30 टक्‍के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्‍के अनुदान मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे ऑनलाईन करावे लागणार आहेत. या योजनेची सविस्तर माहिती लवकरच राज्य शासनाद्वारे प्रसिध्द करण्यात येणार आहे. यापूर्वी पाच हेक्‍टरवरील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीच्या योजनेचा पुरेसा लाभ मिळत नव्हता. आता या नव्या योजनेमुळे राज्यातील पाच हेक्‍टरहून अधिक क्षेत्र असलेल्यांनाही लाभ मिळणार आहे. त्यातून राज्यात फळबागांचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल, अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाकडून देण्यात आली. 

योजनेच्या ठळक बाबी 
- पहिल्या वर्षासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद 
- या वर्षासाठी 20 हजार हेक्‍टर क्षेत्र 
- जिल्हानिहाय लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात येणार 
- कोकण विभागासाठी 10 हेक्‍टरची अट 
- पश्‍चिम महाराष्ट्रासह अन्य विभागांसाठी सहा हेक्‍टरची अट 
- तीन वर्षात टप्प्याटप्यात सर्वच शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

Web Title: solapur news New scheme for fruit garden