पोषण आहाराबाबत केंद्र व राज्याची नाराजी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सोलापूर - सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. 15 जून 2016 पासून शालेय पोषण आहाराची माहिती "एमडीएम' या ऑनलाइन पोर्टलवर भरण्याचा आदेश सरकारने दिला आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील केवळ 63.65 टक्के शाळांनीच ही माहिती भरल्याने केंद्र व राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. 

"एमडीएम' पोर्टलवर दररोज शालेय पोषण आहार किती विद्यार्थ्यांनी घेतला याची संख्या संबंधित पोर्टलवर भरणे बंधनकारक केले आहे. त्या माहितीच्या आधारे संबंधित शाळेचे शालेय पोषण आहाराचे बिल दिले जाते. मात्र, ही माहिती अर्धवट भरल्यामुळे शाळांना बिले देणे अडचणीचे झाले आहे. जिल्ह्याचा 16 ऑगस्टचा अहवाल पाहिला असता शालेय पोषण आहार योजनेस पात्र असलेल्या चार हजार 80 शाळांपैकी दोन हजार 597 एवढ्या शाळांनीच "एमडीएम' पोर्टलवर माहिती भरल्याचे दिसून येते. माहिती भरलेल्या शाळांचे प्रमाण 63.65 टक्के एवढे आहे. ही गोष्ट अतिशय गंभीर असल्याचे प्राथमिकच्या शिक्षण संचालकांनी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: solapur news Nutrition Diet Sarva Shiksha Abhiyan