ऑफिस बॉयने केली सचिवाची बनावट सही!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

बॅंक कर्मचाऱ्याला हाताशी धरून काढले साडेपाच लाख रुपये

सोलापूर: रविवार पेठेतील निरामय आरोग्यधाम समाजसेवा संस्थेत ऑफिस बॉय असलेल्या तरुणाने धनादेशावर संस्थेच्या सचिवाची बनावट सही करून पाच लाख 55 हजार 150 रुपये काढून फसवणूक केल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली. पैसे काढण्यासाठी त्याने बॅंक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्याला हाताशी धरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ऑफिस बॉय सागर धायगुडे आणि बॅंक ऑफ महाराष्ट्र नवीपेठ येथील कर्मचाऱ्यावर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. भालचंद्र वायुदेव किणीकर (वय 70, रा. चिरंजीव बंगला, शेळगी रोड, रविवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठ शेळगी रोड परिसरात निरामय आरोग्यधाम समाजसेवी संस्थेचे कार्यालय आहे. ऑफिस बॉय असलेल्या सागर धायगुडे याने संस्थेचा धनादेश घेतला. सेक्रेटरीची बनावट सही करून धनादेशावर संस्थेचा शिक्का न मारता नवी पेठेतील महाराष्ट्र बॅंकेत असलेल्या एका कर्मचाऱ्याला हाताशी धरून संस्थेच्या खात्यावरील पाच लाख 55 हजार 150 रुपये काढून घेतले. सहायक पोलिस निरीक्षक गोविंद पांढरे तपास करीत आहेत.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
भाजपा म्हणते, राहुल गांधींचे जॅकेट 70 हजारांचे
आई-बाबा सांगा ना, आमची काय चूक...​
मृत तरुणी परत आल्याच्या अफवेने गोंधळ​
"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास​
सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी रजा नको; न्यायालयाची सूचना​
विकासवृद्धीसाठी झेपावे निर्यातीकडे!​

श्रीमंत देशांत भारत सहावा; अमेरिका प्रथम
तनिष्कने केली 1045 धावांची नाबाद विश्‍वविक्रमी खेळी​
दोषींवर कडक कारवाई करू; आदित्यनाथ यांनी मौन सोडले​

Web Title: solapur news office boy duplicate signature secretary