विठ्ठल मंदिर हाणामारीप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील एक सुरक्षारक्षक आणि एक हंगामी कर्मचारी यांच्यात रविवारी (ता. 23) दुपारी दर्शनाला नागरिकांना सोडण्याच्या कारणावरून धक्काबुक्की व हाणामारीची घटना घडली होती. या घटनेची दखल घेऊन सुरक्षारक्षक पांडुरंग साळुंखे आणि हंगामी कर्मचारी नारायण वाघ यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने गेल्या काही वर्षांत अनेक हंगामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दर्शनाला मधून सोडण्यावरून अनेक वेळा वाद होत असतात. काही कर्मचारी पैसे घेऊन भाविकांना मधून सोडतात, अशी चर्चा सातत्याने होत असते. या पार्श्‍वभूमीवर रविवारी श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडपात नागरिकांना दर्शनाला सोडण्याच्या कारणावरून सुरक्षारक्षक पांडुरंग साळुंखे आणि हंगामी कर्मचारी, वाहनचालक नारायण वाघ यांच्यात वाद निर्माण झाला. त्यातून त्यांच्यात धक्काबुक्की होऊन हाणामारीची घटना घडली होती. या घटनेची दखल घेऊन मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी समितीचे कार्यकारी अधिकारी तेली यांच्याकडे केली होती.

Web Title: solapur news pandharpur vitthal mandir