सोलापूरच्या वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर 

हर्षल आकुडे
शनिवार, 22 जुलै 2017

सोलापूर - मागील काही दिवसांपासून पोलिसांनी सोलापुरातील वाहनधारकांना शिस्त लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी करून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलिसांचा मूळ उद्देश शहरातील लोकांना त्रास देणे हा नसून, या माध्यमातून गुन्हेगारांवर करडी नजर ठेवणे, गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या गुन्हेगारांना वेळीच हेरून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, हा असल्याचे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. 

मे महिनाअखेरीस पोलिसांनी सोलापुरातील विविध चौकांमध्ये लावलेल्या सीसी टीव्हीच्या मदतीने नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली होती. शहरातील पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांना संवेदनशील पॉइंटवर कोणत्याही वेळी एक किंवा दोन तास तपासणी करण्याबाबत अधिकार दिले आहेत. त्यानुसार शहरातील सात पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांना, तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलिस कोणत्याही वेळी नाकाबंदी करू शकतील. त्यामुळे वाहनचालकांना शिस्त लावतानाच गंभीर गुन्ह्यांचा तपासही समांतरपणे चालू राहणार आहे. गेल्या वर्षात सोलापूर पोलिसांनी 52 गुंडांना तडीपार केले होते. चालू वर्षात आतापर्यंत 14 गुंड तडीपार आहेत. मागील आठवड्यात दोन तडीपार गुंड शहरात फिरताना पोलिसांनी पकडले होते. 

Web Title: solapur news police