पंतप्रधान मोदींची उलटी गणती सुरू - प्रणिती शिंदे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

सोलापूर - निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने फोल ठरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची उलटी गणती सुरू झाली आहे. त्यामुळे जनताच आता त्यांना घरचा रस्ता दाखवेल, अशी भविष्यवाणी आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी केली. 

केंद्र व राज्य सरकार तसेच, महापालिकेतील कारभाराच्या विरोधात शहर व जिल्हा कॉंग्रेसतर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. त्यानंतर महापालिकेसमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाल्या, ""भाजप सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) सोलापुरातील उद्योग-व्यवसाय अडचणीत आले आहेत. नोटाबंदीचा फायदा फक्त भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलास झाला आहे. नोटाबंदीमुळे सर्वत्र मंदी असताना शहा यांच्या मुलाच्या कंपनीची उलाढाल कित्येक पटीने वाढली आहे. त्यामुळे जनताच आता मोदींना त्यांची जागा दाखवून देईल.''

Web Title: solapur news Praniti Shinde