अक्कलकोट: आळगे, हिळ्ळी बंधाऱ्यावरून वाहत आहे पाणी

राजशेखर चौधरी
रविवार, 17 सप्टेंबर 2017


हिळ्ळी बंधाऱ्यावर १ लाख ३० हजार क्यूसेक्स प्रति सेकंद इतके पाणी वाहिले तरी काही नुकसान होणार नाही वा गावात पाणी शिरणार नाही.नागरिकांनी काळजी घ्यावी व दक्षता म्हणून नदीकाठी जाऊ नये.सध्या यापुढे पाऊस न झाल्यास पुर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाही.
- नारायण जोशी : कार्यकारी अभियंता, भीमा विकास विभाग

अक्कलकोट : मागील आठवड्यात पुन्हा उजनीच्या लाभक्षेत्रात आणि सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मोठ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा शेवटचा बंधारा शुक्रवारी  सकाळी ११.३० पासूनच ओव्हरफ्लो झाला असून आज रविवारी सायंकाळी ६ वाजता आळगे व हिळ्ळी  बंधाऱ्यांवरून ७ ते ८ फूट इतके पाणी वाहात होते.

सायंकाळी ६ वाजल्याच्या माहितीनुसार उजनी आणि वीर धरणातील काल सोडलेले पाणी आज आळगी व हिळ्ळी या दोन्ही बंधाऱ्यात पोचले. धरणातील  स्थानिक सोलापूर जिल्ह्यातील परिसरातला पाऊस याचा विचार करता पाणी वाढलेले दिसत आहे.त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान नदीकाठी आणलेल्या मोटारी व इतर शेती साहित्य नदीकाठच्या शेतकऱ्यांनी पून्हा काढण्यास आज सकाळपासूनच  सुरू केली आहे.हिळ्ळी मार्गे कर्नाटकातील गुब्याड वरून इंडी व विजयपूर कडे जाणारा मार्ग आणि आळगी बंधाऱ्यांवरून हलसंगी व इंडिकडे जाणार मार्ग काल सायंकाळपासून पुन्हा बंद झालेला आहे.

बंधाऱ्यातील मोठ्या प्रमाणात आलेले पाणी पाहून मोह न आवरलेल्या  गावकऱ्यांनी व परिसरातील नागरिक मोठी गर्दी करीत आहेत.दरम्यान आज उजनी आणि वीर मधून विसर्ग ५ हजार क्यूसेक्स इतका कमी केला असला तरी काल सोडलेले पाणी उद्यापर्यंत कायम राहणार आहे.या दोन्ही बंधाऱ्यावरील ओव्हरफ्लो पाण्याने हिळ्ळी, कुडल, शेषगिरी, आळगे शेगांव, गुडेवाडी, धारसंग, व अंकलगे ही गावे प्रभावित झाले आहेत.त्यांना भीमा नदी पलीकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.या सर्व गावाचे नदीच्या दोन्ही काठाचे सलग तीन चार एकर ऊस पाण्याखाली गेला आहे.

हिळ्ळी बंधाऱ्यावर १ लाख ३० हजार क्यूसेक्स प्रति सेकंद इतके पाणी वाहिले तरी काही नुकसान होणार नाही वा गावात पाणी शिरणार नाही.नागरिकांनी काळजी घ्यावी व दक्षता म्हणून नदीकाठी जाऊ नये.सध्या यापुढे पाऊस न झाल्यास पुर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाही.
- नारायण जोशी : कार्यकारी अभियंता, भीमा विकास विभाग

Web Title: Solapur news rain Akklakot