परतीच्या पावसामुळे ज्वारीच्या उत्पन्नात होणार घट

हुकूम मुलाणी
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

जिरायत क्षेत्रातील पाणी लागल्याने सुर्यफुलाचे काढणी करता आली नाही तर रब्बीसाठी वापशा आल्यावर पेरणी करावी लागणार असली होणारा खर्च जास्तीचा आहे. गेल्या चार वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाकडून मदतीची आवश्यकता आहे. - युवराज पाटील, शेतकरी

मंगळवेढा : तालुक्यात परतीच्या पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे रब्बी पिकातील ज्वारीच्या पेरणीसाठी वापश्याची प्रतिक्षा करावी लागणार असल्यामुळे ज्वारीच्या उत्पन्नात घट होणार आहे. तर खरीप हंगामातील हाताला आलेल्या सुर्यफुलाचे मात्र नुकसान झाले.

शहर व ग्रामीण भागात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे शेतकरी वर्ग सुखावला असून आता वापश्याचीच प्रतिक्षा शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. दुष्काळी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता सद्यस्थितीला तालुक्यातील दुष्काळाची मुक्ती निसर्गानेच केली. ज्वारीचे शिवार असलेल्या तालुक्यात या पावसाने झोडपण्याने शिवारात अजून पाणी असून तणाची वाढ होणार असून विलंबाने होणाऱ्या पेरणीसाठी जादा खर्च येणार आहे. हरभरा व गहू ही पिके हाताला लागतील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. विविध योजनेच्या माध्यमातून झालेले सिमेंट बंधारे ओव्हरप्लो होऊन वाहू लागले व कृषी विभागाने केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची फलनिष्पती होत असून झिरपलेले पाणी आता जमिनीच्या बाहेर वाहू लागले.

तालुक्यात घराची पडझड झाली असून शिरनांदगी, पडोळकरवाडी, डोंगरगाव, खडकी, लक्ष्मी दहीवडी या तलावातील पाणीसाठा वाढू लागला आहे. खरीप हंगामही कमी पावसाने वाया गेला. काही उभ्या पिकात जनावरे सोडली. पण हाताशी आलेल्या बाजरी व सुर्यफूल या पिकाचे जमिनीस पाणी लागल्याने काढणी करता आली नाही. घराच्या व पिकाच्या नुकसानीबाबत महसूल विभागाने अद्यापही दखल घेतली नाही. खरीपासाठी केलेला खर्च व रब्बीसाठी करावा लागणारा खर्च यासाठी शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचणीमुळे शक्य नसले तरी शासनाकडून तालुक्यातील शेतकऱ्यास देय असलेले 58 कोटीचा दुष्काळ निधी दिला. तर शेतकऱ्याला रब्बी पेरणीसाठी आधार होवू शकतो.

जिरायत क्षेत्रातील पाणी लागल्याने सुर्यफुलाचे काढणी करता आली नाही तर रब्बीसाठी वापशा आल्यावर पेरणी करावी लागणार असली होणारा खर्च जास्तीचा आहे. गेल्या चार वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाकडून मदतीची आवश्यकता आहे. - युवराज पाटील, शेतकरी

Web Title: Solapur news rain effect on jwar