पोषण आहाराचा दर्जा उंचावणार 

संतोष सिरसट 
मंगळवार, 26 जून 2018

सोलापूर - सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे बालकांच्या आरोग्यावर व वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून डबल ‘फोर्टिफाईड’ खाद्यतेल व मीठ देण्याचे आदेश शासनाने नागरी भागातील शाळांना दिले आहेत. हे देण्याकडे दुर्लक्ष केल्यास आहार शिजविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही शासनाने  दिला आहे.

शासनाच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारचा मेनू निश्‍चित केला आहे. त्यानुसार मुलांना आहाराचा पुरवठा केला जातो. हा आहार शिजवताना चांगल्या प्रकारचे तेल व मीठ वापरले न गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर यामुळे विद्यार्थ्यांच्या वाढीवरही परिणाम झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे डबल ‘फोर्टिफाईड’ खाद्यतेल व मीठ दिल्यास त्यातून विटामिन ‘अ’ व ‘ड’ बालकांना मिळणार आहे. नागरी भागामध्ये म्हणजे महापालिका, नगरपालिका या भागामध्ये याची अंमलबजावणी करायची आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाककृतीची निवड महापालिका व नगरपालिका स्तरावर करायची आहे. कोणत्या दिवशी कोणती पाककृती द्यायची याची निश्‍चिती अगोदर करायची आहे. प्रत्येक दिवशी निश्‍चित केलेल्या पाककृतीप्रमाणे विद्यार्थ्यांना आहाराचा पुरवठा करायचा आहे. आहाराचा पुरवठा करणाऱ्या संस्थेने नियमित आहाराबरोबरच आठवड्यातून एकदा पूरक आहाराचा पुरवठा करणे बंधनकारक आहे.

ग्रामीण भागात पुरवठा सुरू
डिसेंबर २०१७ पासून तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी नव्या संस्थांची नेमणूक केली आहे. त्या संस्थांनी तेव्हापासूनच ग्रामीण भागामधील शाळांमध्ये डबल ‘फोर्टिफाईड’ खाद्यतेल व मीठ देण्यास सुरवात केली आहे. 

Web Title: solapur news Raising the level of nutrition