....अन्याथा पुर्वीचेच दिवस: रणजितसिंह शिंदे

वसंत कांबळे
गुरुवार, 22 मार्च 2018

कुर्डु (सोलापूर): सिना माढा उपसा जलसिंचन योजना कायम स्वरुपी चालू ठेवण्यासाठी सर्व शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरावे व स्वतःकडे असणारी पाणी पट्टी भरुन सहकार्य करावे, अन्याथा पुर्वीचेच दिवस माढा तालुक्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन बबनराव शिंदे शुगरचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी लऊळ (ता. माढा) येथे केले

सिना माढा उपसा जलसिंचन योजनेचे तोडलेल्या विज कनेक्शनच्या संदर्भात शेतकर्‍यांनी पाणी भरावी या संदर्भात जगदंबा मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्या वेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपसभापती बंडू नाना ढवळे, विठ्ठलराव शिंदे सह साखर कारखानाचे शेती अधीकारी सुनिल बंडगर, पालवणचे माजी सरपंच सुनिल पाटील, माजी सरपंच नागन्नाथ नलवडे, प्रभाकर भोंग, माजी उपसरपंच वसंतराव नलवडे, संजय लोकरे, संतोष नलवडे, सुनिल नलवडे, गोरख घुगे, कल्याण गाडे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिंदे पुढे म्हणाले, पाणी पट्टी चा तगादा एवढेच वर्षे सोसावा लागणार असुन पुढच्या वर्षी एकुण बिलाच्या एकोणीस टक्के च लाईट बिल भरणा करण्याचा आदेश शासनाने काढला असुन भविष्यात या योजनेला विज बिलाच्या बाबतीत सवलत मिळाल्याने शेतकर्‍यां वरील ताण कमी होणार आहे. या योजनेचे पाणी सर्वाना मिळण्यासाठी गावोगावी पाणीवापर संस्था स्थापण करण्याची गरज आहे तर सर्वांना समान पाणी मिळेल असे नियोजन गावकर्‍यांनी केल्यास पाणी पुरवठा सुरळीत होईल असेही यावेळी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी ही अनेक समस्यांचा पाडा वाचला.

Web Title: solapur news sina madha water tax and ranjitsingh shinde