स्मार्ट सोलापूरकरांसाठी लवकरच "फुटबॉल' मैदान 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 8 जुलै 2018

सोलापूर - स्मार्ट सोलापूरकरांसाठी लवकरच अत्याधुनिक "फुटबॉल'मैदान उभारले जाणार आहे. त्यासाठी संभाव्य जागेची पाहणी महापालिका आयुक्तांनी केली असून, लवकरच मैदानाचा आराखडा निश्‍चित होण्याचे संकेत त्यांनी "सकाळ'शी बोलताना दिले. 

सोलापूर - स्मार्ट सोलापूरकरांसाठी लवकरच अत्याधुनिक "फुटबॉल'मैदान उभारले जाणार आहे. त्यासाठी संभाव्य जागेची पाहणी महापालिका आयुक्तांनी केली असून, लवकरच मैदानाचा आराखडा निश्‍चित होण्याचे संकेत त्यांनी "सकाळ'शी बोलताना दिले. 

सध्या विश्‍वकप स्पर्धेमुळे जगभर फुटबॉलचा फिवर पसरला असताना त्यात सोलापूरकर मागे कसे राहतील. स्मार्ट सोलापूरकरांच्या फुटबॉलप्रेमाची पूर्तता करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी एक पाऊल पुढे टाकले असून, एका कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक फुटबॉल मैदान बनविण्याची योजना तयार झाली आहे. त्यासाठी संबंधित कंपनीने 50 लाख रुपये देण्याचीही तयारी दर्शविली आहे. यासंदर्भात आवश्‍यक कार्यवाही पूर्ण झाल्यावर मैदानाची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. 

डॉ. ढाकणे यांनी अक्कलकोट रस्ता परिसरातील सूत गिरणीच्या आतील खुल्या जागेची पाहणी केली. त्या ठिकाणी पालिकेचे कार्यालय सुरु करता येईल का याची चाचपणी केली. या ठिकाणी कार्यालय झाल्यास मनपाची प्रशासकीय कामे करण्यासाठी सोपे आणि सोयीस्कर होईल असे नगरसेवक राजकुमार हंचाटे  हंचाटे यांनी सुचवले. त्यानंतर आयुक्तांनी कर्णिकनगर परिसरातील एका ठिकाणच्या खुल्या जागेची पाहणी केली. त्या ठिकाणी फुटबॉल मैदान होण्याची शक्‍यता आहे. 

फुटबॉल प्रेमींची सोय व्हावी यासाठी फुटबॉल मैदानाची संकल्पना आहे. त्यासाठी एका कंपनीने 50 लाख रुपये सीएसआर फंडातून देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. 
- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त 

Web Title: solapur news smart city