200 रुपयांच्या कपातीमुळे नगरसेवकांतून नाराजी

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

नगरसेवकांना मिळणाऱ्या मानधनातून पहिल्यांदाच कपात होत आहे. नगरसेवकांच्या मानधनातून कपात करणे योग्य नाही. तरी याबाबत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा आणि सर्व मानधन नगरसेवकांना द्यावे.
- श्रीदेवी फुलारे, नगरसेविका

सोलापूर: नगरसेवकांच्या मानधनातून व्यवसाय कर म्हणून 200 रुपयांची कपात सुरू झाली आहे. त्यामुळे नगरसेवकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर नगरसचिव कार्यालयाने विधान सल्लागारांकडे अभिप्राय मागविला आहे.

जुलै 2017 पर्यंत नगरसेवकांना 7,500 रुपये मानधन होते. शासनाने मानधनवाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार आता दरमहा 10हजार रुपये मानधन झाले आहे. मानधनाच्या रकमेचा टप्पा ओलांडल्याने दरमहा 200 रुपये व्यवसाय कर म्हणून कपात करण्यात येत आहेत. नव्या निर्णयानुसार मूळ मानधन 10 हजार रुपये आणि चार सभांसाठीचा विशेष भत्ता 400 रुपये याप्रमाणे 10 हजार 400 रुपये दिले जातात.

नगरसेवकांना मिळणारे मानधन अपुरे आहे. त्यातच ही कपात सुरू झाल्याने नगरसेवकांतून नाराजी व्यक्त होत आहे. लेटरपॅडही पदाधिकाऱ्यांना देण्यात येतात. नगरसेवकांना पुरेसे लेटरपॅडही दिले जात नाहीत. अशा स्थितीत 200 रुपयांची कपात योग्य नाही, असे मत नगरसेवकांतून व्यक्त होत आहे.

व्यवसाय कर विभागाचा अभिप्राय
व्यवसाय कर कायदा (कलम-2एच) नुसार मानधन हे "सॅलरी'च्या व्याख्येत येते. त्यामुळे त्यातून परिशिष्ट - आय नुसारच्या तक्‍त्यानुसार व्यवसाय कर कपात करून मानधन देण्यात यावे व हा कर प्रत्येक महिन्यात ई-पेमेंटद्वारे भरण्यात यावा व त्याचे विवरण ऑनलाइन देण्यात यावे, असा अभिप्राय व्यवसाय कर अधिकारी सुरेश शिंदे यांनी दिला आहे.

आकडे बोलतात...
दरमहाची कपात रुपये : 200
एकूण नगरसेवक : 107
एकूण कपात : 21, 400
आतापर्यंत भरले : 85,600

Web Title: solapur news solapur municipal corporator loath