देशमुखांची गटबाजी सुरुच... मुख्यमंत्री आपटले तोंडावर

devendra fadnavis
devendra fadnavis

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व परिवहन राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यात सुरु असलेली गटबाजी कायम आहे. गटबाजी संपवा नाहीतर महापालिका बरखास्त करतो, असा दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देउन देखील आज (सोमवार) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन्ही देशमुखांच्या नगरसेवकांची गटबाजी बघायला मिळाली.

सोलापूर महापालिकेतील सोलापूर महानगरपालिकेची नोव्हेंबर महिन्यातील तहकुब सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी सभा सुरू झाल्यानंतर सुचना नागेश वल्याळ व श्रीनिवास रिकमल्ले या दोघांनी एकत्रितपणे वाचण्यास सुरूवात केली. याला विरोधी पक्षाचे आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे यांनी हरकत घेतली़ प्रभारी सभागृहनेता कोण आहे, सुचना दोन्हीजण एकाच वेळी कसे वाचन करीत आहेत, यावर गोंधळ सुरू झाला. महापौर शोभा बनशेट्टी यांनी नागेश वल्याळ यांनी सुचना वाचावी असे आदेश दिले. त्यावर उपमहापौर शशिकला बत्तुल यांच्यासह पालकमंत्री गटाचे सर्वच सदस्य सभागृहाबाहेर पडले. गोंधळातच वल्याळ यांनी सुचना मांडल्या़ त्यावर चेतन नरोटे यांनी सभागृहात कोरम आहे का असा प्रश्न उपस्थित केला. या गोंधळातच राजकुमार हंचाटे यांनी उपसुचना वाचली. त्यामुळे विरोधी सदस्य गोंधळ करू लागले. या गोंधळातच महापौर शोभा बनशेट्टी यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर केल्याचे घोषित करून सभा तहकुब केली.

सिध्देश्वर यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही मंत्री देशमुखामध्ये एकोपा घडवून आणल्याचे चित्र होते. परंतु हा एकोपा नव्हे तर देखावाच असल्याचे आजच्या सभेतून सिद्ध झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com