सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरासाठी आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांचे नाव न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल. त्यासाठीची भूमिका 4 नोव्हेंबरला कपिलधारा येथे होणाऱ्या मेळाव्यात स्पष्ट केली जाईल, असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी सांगितले. 

सोलापूर विद्यापीठाला श्री सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी शिवा संघटना व विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील आणि कर्नाटकमधील जवळपास 70-75 हजारांच्या संख्येने समाजबांधव एकवटले होते. मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले.

Web Title: solapur news solapur university