सोलापूर महापालिकेत अत्याधुनिक अग्निविमोचक यंत्रे 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 3 जानेवारी 2018

सोलापूर - महापालिकेच्या अखत्यारीतील प्रमुख इमारतींसह आठ झोन समिती कार्यालयांत अग्निरोधक यंत्रणा बसविण्यासाठी अत्याधुनिक अग्निविमोचक यंत्रे बसविण्यात येणार आहेत. सुमारे 135 यंत्रे महापालिकेस उपलब्ध झाली आहेत. 

आयुक्तांनी सर्व कार्यालयासाठी रचना, वापरण्यात येणारी यंत्रणा, एसी मशिनरी, वीज मीटरचे रीडिंग, कोणत्या प्रकारचे फायरप्रूफ पेंट, त्यासाठी लागणारी फायर इन्स्ट्रुमेंट, फायर रिफलिंग, धोक्‍याची घंटा, डिटेक्‍ट मशिन, बाहेर पडण्यासाठी रात्रीच्या वेळी "एक्‍झिट'ची सुविधा याबाबत सूचना केल्या. 

सध्या इंद्रभुवन इमारतीमध्ये काही ठिकाणी अग्निरोधक यंत्रे आहेत. प्रशासकीय इमारतीत फक्त नगर अभियंता कार्यालयात ही व्यवस्था आहे. तर कौन्सिल हॉलमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे कार्यालय आणि यशवंतराव चव्हाण सभागृहासह नऊ ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा आहे. प्रशासकीय इमारतीमध्ये भूमी व मालमत्ता, नगररचना, करआकारणी ही प्रमुख कार्यालये आहेत. या विभागाशी संबंधित अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रे या ठिकाणी ढिगाने पडून आहेत. मात्र त्याच्या सुरक्षेची काहीही व्यवस्था या ठिकाणी नाही. दुर्दैवाने एखादी आगीची घटना झाली तर या क्षणाला आग विझविण्यासाठी कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. 

यंत्रणा बसविण्याची ठिकाणे 
- इंद्रभुवन इमारत 
- प्रशासकीय इमारत 
- कौन्सिल हॉल इमारत 
- निवडणूक कार्यालय 
- आठ झोन कार्यालये 

अग्निसुरक्षेसाठीची यंत्रणा 
- अग्निविमोचन यंत्र (सिलिंडर)ं 
- नळखांब (हॅड्रोलिक पाइप) 
- फायर अलार्म (सूचना यंत्र) 
- स्प्रिंकल (तुषार यंत्रणा) 
- डिटेक्‍टर्स (अग्निशोधक यंत्र) 

नव्याने बसविण्यात येणारी अग्निविमोचक यंत्रे हे अत्याधुनिक आहेत. यंत्रातील गॅस उपयुक्त आहे की नाही, हे दर्शविणारे घड्याळ असणार आहे. त्यातील काटा "हिरवा' झाला की ते यंत्र नाकाम झाले, हे स्पष्ट होईल. 
- केदार आवटे, अधीक्षक महापालिका अग्निशमन दल 

Web Title: solapur news Sophisticated fire extinguishing machines in Solapur Municipal Corporation