चिमणी दिनी सोलापुरात विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

सोलापूर : जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने शहरात मंगळवारी (ता. 20) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सोलापूर : जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने शहरात मंगळवारी (ता. 20) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज व नेचर कॉन्झर्वेशन सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली इंग्लिश विद्यालय, वडाळा या शाळेच्या विद्यार्थ्यांना नान्नज रेस्ट हाऊस येथे चिमणीसाठी कृत्रिम घरटी तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे प्रमुख भरत छेडा व नंदीकेश नंदर्गी यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. या वेळी वन परिक्षेत्र अधिकारी कल्याणराव साबळे, वनपाल गिरीश कुलकर्णी, वनपाल गुरूदत्त दाभाडे, वन रक्षक ठेंगील, जवळगी, विभुते तसेच माऊली इंग्लिश विद्यालयच्या प्राचार्य सौ. देशमुख आदी उपस्थित होते.

सिद्धेश्‍वर प्रशालेत कार्यशाळा
जागतिक चिमणी दिनी सिद्धेश्‍वर प्रशाला राष्ट्रीय हरित सेना आणि नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या वतीने चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. पप्पू जमादार यांनी चिमणी घरटी तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः चिमणी घरटी तयार केले. बसवराज बिराजदार यांनी चिमण्यांना पाणी ठेवण्यासाठी मातीचे भांडी विद्यार्थ्यांना वाटप केली. विनोद बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक शिवानंद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे राजकुमार कोळी, प्रवीण सुरवसे, शुभम बाबानगरे आदी उपस्थित होते.

मातीची भांडी वाटप
भारतीय जैन संघटनेच्या वतीने पक्षीमित्र मुकुंद शेटे व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते चिमण्यांना पाणी पिण्यासाठी मातीची भांडी वाटप करण्यात आली. हा कार्यक्रम नेहरूनगर, शासकीय मैदान येथे झाला. या वेळी श्‍याम पाटील, माया पाटील, पंकजा पंडित आदी उपस्थित होते.

Web Title: solapur news sparrow day