सुभाष देशमुखांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाचे नाव बदलून, जातीला आरक्षण आणि लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मागून पोट भरणार आहे का? असे म्हणणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; अन्यथा लिंगायत समाजाच्या सर्व संघटना एकत्रित करून राज्यभर मोर्चे काढू, असा इशारा महाराष्ट्र बसव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ऍड. शिवानंद हैबतपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

हैबतपुरे म्हणाले, ""देशमुख यांनी लातूरच्या बसव महामेळाव्यात केलेल्या अशा वक्तव्यामुळे लिंगायत समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्‍वरांचे नाव देण्याच्या मागणीसाठी लिंगायत समाज संघर्ष करत आहे. कर्नाटक सरकारने स्वतंत्र धर्माची शिफारस केली असताना सहकारमंत्र्यांनी असे वक्तव्य करणे हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. देशमुखांनी लिंगायत समाजाची काळजी करण्यापेक्षा स्वतःची नैतिकता तपासावी.'' 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशमुखांची हकालपट्टी करून लिंगायत समाजाची माफी मागावी; अन्यथा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

Web Title: solapur news Subhash Deshmukh removal from the cabinet