साखर उद्योगाच्या संजीवनीसाठी "पीएसएफ' गरजेचे 

संतोष सिरसट
मंगळवार, 23 जानेवारी 2018

 सोलापूर - साखरेच्या कमी होणाऱ्या किमतीमुळे राज्यातील साखर उद्योगावर सध्या संकटाचे ढग घोंगावत आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने "पीएसएफ' (प्राइज स्टॅबिलायजेशन फंड) तयार करणे गरजेचे झाले आहे. राज्यात यंदा 84 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. मात्र, कोसळलेल्या साखरेच्या दरामुळे कारखान्यांना "एफआरपी' देणेही शक्‍य नसल्याचे चित्र साखर उद्योगात निर्माण झाले आहे. 

एक नोव्हेंबरपासून राज्यात साखर हंगाम सुरू झाला आहे. सुरवातीच्या काळात झालेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात 75 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, जसजसा गाळप हंगाम पुढे गेला तसतसे साखरेच्या उत्पादनामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. एकीकडे साखरेचे उत्पादन वाढत असताना साखरेच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला तीन हजार 600 रुपयांवर असलेली साखर आता दोन हजार 850 रुपयांवर आली आहे. मागील वर्षी याच्या नेमके उलटे चित्र होते. मागील वर्षी गाळप हंगामाच्या सुरवातीला तीन हजार 200 रुपयांवर असलेली साखर तीन हजार 600 रुपयांपर्यंत गेली होती हे विसरून चालणार नाही. साखरेचे दर कमी झाल्यामुळे कारखान्यांना बॅंकांकडून मिळणारी रक्कमही कमी झाली आहे. सध्या बॅंकांकडून साखर कारखान्यांना प्रतिक्विंटल साखरेसाठी दोन हजार 400 रुपये दिले जात आहेत. त्यातील 700 रुपये खर्च होत आहेत. उर्वरित एक हजार 700 रुपयेच पहिली उचल म्हणून शेतकऱ्यांना देण्यासाठी शिल्लक राहत असल्याचे चित्र आहे. 

ही स्थिती सुधारण्यासाठी केंद्र शासनाने आयात शुल्क 100 टक्के करावे. निर्यातशुल्क शून्य टक्के करावे. साखर निर्यातीला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व आपल्या साखरेमध्ये असलेल्या रकमेच्या तफावतीसाठी शासनाने अनुदान द्यावे. साखर उद्योगाला संजीवनी देण्यासाठी "पीएसएफ' उभारण्याची गरज आहे. 
महेश देशमुख, अध्यक्ष, लोकमंगल साखर कारखाना, सोलापूर 

Web Title: solapur news sugar factory