'सुशील करंडक' 2 फेब्रुवारीपासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

सोलापूर - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेने राज्यस्तरीय सुशील करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार आहे. यासाठी कलाकारांनी 15 जानेवारीपर्यंत प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धा तीन सत्रांमध्ये होणार आहेत. स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या संघास सुशील करंडक, प्रमाणपत्र व 25 हजार रुपये, द्वितीय संघास 15 हजार, तर तृतीय संघास 10 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्‍वसंगीत यांनाही रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे.

Web Title: solapur news sushil karandak one act play competition