शिक्षकांवर अद्यापही बदलीचे सावट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

सोलापूर - जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा घोळ अद्यापही न मिटल्यामुळे शिक्षकांची यंदाची दिवाळी तणावाखालीच गेली आहे. अशातच दिवाळीच्या सुटीनंतर उद्यापासून (सोमवार) शाळा नियमित सुरू होत आहेत. त्यामुळे शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, शिक्षकांवर अद्यापही बदलीचे सावट घोंघावत आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाने ऑनलाइन बदल्या करण्याच्या प्रयत्नात या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूपच गोंधळ घातला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपून दुसऱ्या सत्राची सुरवात उद्यापासून (सोमवार) होत आहे. मात्र, अद्यापही सरकारला जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. बदलीपात्र शिक्षकांसाठी यंदाची दिवाळी कायमस्वरूपी लक्षात राहील, अशीच गेली आहे. ऐन दिवाळीच्या काळातही कुटुंबासोबत मनमुराद आनंद लुटण्याऐवजी हे शिक्षक बदलीचे अर्ज भरण्यातच गुंतले होते.

प्रदूषणमुक्त दिवाळी यशस्वी
शालेय शिक्षण विभागाने यंदा प्रथमच दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली होती. शिक्षण विभागाने राबविलेला हा उपक्रम यशस्वी झाल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांना शपथ दिल्याने अनेक विद्यार्थी फटाक्‍यांपासून दूर राहिल्याचे चित्र दिसून आले. मात्र, काही विद्यार्थ्यांनी फटाके वाजवून दिवाळीचा आनंद द्विगुणित केल्याचेही चित्र पाहायला मिळाले. मागील काही वर्षांची तुलना केली असता यंदाच्या दिवाळीमध्ये फटाके फोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.

Web Title: solapur news teacher transfer issue