राज्यात यंदा सव्वा कोटी क्‍विंटल तुरीचे उत्पादन 

तात्या लांडगे 
बुधवार, 27 जून 2018

सोलापूर - राज्यात या वर्षी 12 लाख 47 हजार हेक्‍टरवर तुरीची पेरणी अपेक्षित आहे. त्यातून सुमारे एक कोटी 20 लाख क्‍विंटल तुरीचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता वाढली आहे. 

सोलापूर - राज्यात या वर्षी 12 लाख 47 हजार हेक्‍टरवर तुरीची पेरणी अपेक्षित आहे. त्यातून सुमारे एक कोटी 20 लाख क्‍विंटल तुरीचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता वाढली आहे. 

राज्य सरकारने शेतकऱ्यांकडील तूर 5400 रुपये या हमीभावाने खरेदी केली; परंतु सध्या राज्यातील वखार महामंडळासह सर्व शासकीय गोदांमध्ये तूर व हरभरा, उडीद आणि मूग यांनी तुडुंब भरली आहेत. शेतमाल साठविण्यासाठी अनेक ठिकाणी भाड्याची गोदामे घेतली आहेत. बाजारात तुरीसह आणि डाळीलासुद्धा मागणी नसल्याने सरकारने डाळीचे दर 50 रुपयांवरून 35 रुपये केले आहेत. तरीही डाळ विकली जात नाही. आता आगामी वर्षातील उत्पादित तूर साठवायची कुठे, याची चिंता सरकारला लागल्याची चर्चा आहे. 

खरीप हंगामातील पिकनिहाय क्षेत्र 
तूर -  13.47 लाख हेक्‍टर 
ज्वारीचे क्षेत्र - 7.19 लाख हेक्‍टर 
मूग - 3.97 लाख हेक्‍टर 
उडीद - 3.19 लाख हेक्‍टर 

Web Title: solapur news Tur sowing expected on 12 lakh 47 thousand hectare in the state