"सोलापूरसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करणार'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

सोलापूर - सोलापूर शहरासाठी पुढील आठवड्यात पाणीपुरवठा योजना मंजूर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील वादावर मात्र फडणवीस यांनी बोलणे टाळले. फडणवीस व केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी आज तुळजापूर दौऱ्यावर होते. त्या ठिकाणचा कार्यक्रम संपवून ते सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानी आले. भोजनानंतर फडणवीस विमानतळावर जाण्यासाठी निघाले, त्या वेळी पत्रकारांनी त्यांना दोन्ही देशमुखांच्या वादावर प्रश्‍न विचारला. त्या वेळी फडणवीस यांनी कोणतेही वाद नसल्याचे सांगत दोन्ही देशमुखांना "क्‍लीन चिट' दिल्याचे स्पष्ट झाले. जर दैनिकांमध्ये काही प्रसिद्ध करायचे असेल, तर पुढील आठवड्यात सोलापूरसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करतोय ते प्रसिद्ध करा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
Web Title: solapur news water supply scheme sanction