कोरेगाव भीमा - श्रीपूर येथे एस. टी. बसची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

श्रीपूर येथे घडलेल्या प्रकारामुळे अकलूज स्थानकातील बस सेवा दुपारपर्यंत बंद ठेवली होती. या काळात प्रवाश्‍यांना ताठकळत बसावे लागले होते. अकलूज येथील दैनदिन व्यवहार आज बंद होते. एस. टी. सेवा बंद पडल्याने अनेक प्रवाशी रस्त्यातच अडकुन पडले. सकाळी बाजरपेठेतील दैनदिन व्यवहार सुरू झाले होते. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळपासूनच तरुणांची मोठी गर्दी जमली होती

सोलापूर/ अकलूज - कोरेगाव भीमा येथे घटनेचे पडसाद आज (मंगळवारी) माळशिरस तालुक्‍यात उमटले. या घटनेचा निषेध व्यक्त करत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तर, श्रीपूर येथे आंदोलकांनी रस्त्यावर निकामी टायर जाळून एस. टी. बसची तोडफोड केली.

श्रीपूर येथे घडलेल्या प्रकारामुळे अकलूज स्थानकातील बस सेवा दुपारपर्यंत बंद ठेवली होती. या काळात प्रवाश्‍यांना ताठकळत बसावे लागले होते. अकलूज येथील दैनदिन व्यवहार आज बंद होते. एस. टी. सेवा बंद पडल्याने अनेक प्रवाशी रस्त्यातच अडकुन पडले. सकाळी बाजरपेठेतील दैनदिन व्यवहार सुरू झाले होते. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळपासूनच तरुणांची मोठी गर्दी जमली होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास या गर्दीचे निषेध मोर्चात रुपात्तंर झाले. शहरातून हा मोर्चा जात असताना व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून व्यवहार बंद केले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात येऊन मोर्चेकऱ्यांनी विविध समाज घटकांसह विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने निवेदन दिले. माळशिरस, खुडूस, माळीनगर, नातेपुते, वेळापुर, पिलीव, श्रीपुर आदी गावात कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध व्यक्त करीन बंद पाळण्यात आला. 

पंढरपुरात उद्या बंदचे आवाहन 
पंढरपूर : कोरेगाव भीमा आणि वढू येथील घटनांच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. 4) पंढरपूर बंदचे आवाहन विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने केले आहे. त्या दिवशी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध सभेचे आयोजन केले आहे. 

काल (सोमवारी) विजयस्तंभाला अभिवादनावेळी अमानुष दगडफेक करण्यात आली. गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेच्या संदर्भात येथील विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी आज (मंगळवारी) बैठक झाली. या बैठकीत गुरुवारी (ता. 4) पंढरपूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दिवशी सकाळी नऊ ते एक यावेळात हा बंद राहील. कार्यकर्त्यांनी बंद शांततेत पार पाडण्याची दक्षता घेण्याचेही बैठकीत ठरवण्यात आले.

Web Title: solapur news: western maharashtra news