सोलापूर - पोटनिवडणुकीसाठी चौघांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

सोलापूर : जोरदार शक्तीप्रदर्शन करत चार उमेदवारांनी आज महापालिका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे तौफीक हत्तुरे, 
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे नलिनी कलबुर्गी, एमआयएमतर्फे पीरअहमद शेख आणि अपक्ष वसीम सालार यांनी अर्ज दाखल केले.

शिवसेना आणि भाजपने अद्याप उमेदवारी दाखल केली नाही. उमेदवारी दाखल करण्याचा उद्या (मंगळवारी) शेवटचा दिवस आहे. काँग्रेसचे नगरसेवक रफीक हत्तुरे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.
 
Web Title: solapur by poll 4 candidates applied