सोलापुरात मंगळवारपासून श्री संकल्पसिद्धी महोत्सव ; फडणवीस, शिंदेंची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

श्री बृहन्मठ होटगी मठाचे तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या श्री संकल्पसिद्धी महोत्सवाची सुरवात मंगळवारपासून (ता.17) होत आहे. 27 एप्रिलला समारोप होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.

सोलापूर : श्री बृहन्मठ होटगी मठाचे तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या श्री संकल्पसिद्धी महोत्सवाची सुरवात मंगळवारपासून (ता.17) होत आहे. 27 एप्रिलला समारोप होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.

अक्कलकोट रस्त्यावरील श्रीवीर तपस्वी प्रांगणात हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री विजय देशमुख आणि कार्याध्यक्ष तथा आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली. यावेळी मठाध्यक्ष डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, इंदूमती अलगोंडा पाटील, शिवानंद पाटील उपस्थित होते. मंगळवारी सकाळी सात वाजता जलकुंभ मिरवणूक काढण्यात येणार आहे. याशिवाय 19 ते 26 एप्रिल या कालावधीत रुद्रहोम विधी, गोमाता पूजन, पारायण, प्रवचन होणार आहे.

गुरुवारी (ता. 26) राष्ट्रीय भावैक्य धर्मसंमेलन होणार आहे. याच दिवशी 1008 गोमातांचे पूजनही होणार आहे. याशिवाय श्री रुद्रहोम, श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथ पारायण होणार आहे. 27 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता मुर्तींचे लोकार्पण आणि विरशैव लिंगायत सम्मेलन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजय देशमुख आणि उपाध्यक्षस्थानी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे असतील. सायंकाळी सात वाजता श्री वीरतपस्वी लक्षदिपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे.

Web Title: Solapur SankalpSiddhi Function CM Phadanis will Attend