'औज' कोरडा; टाकळीत नऊ फूट पाणी 

Solapur state in threats of drought
Solapur state in threats of drought

सोलापूर  ः शहराला पाणीपुरवठा होणारा औज बंधारा कोरडा पडला आहे. टाकळी येथील भीमा नदीत असलेले नऊ फूट पाणी 10 दिवस पुरेल. त्यानंतर 'जलसंक्रात'मुळे शहरात एक महिना अगोदरच "शिमगा' होणार आहे. 

बंधाऱ्याच्या पात्रात चर पाडून पाणी घेतले जात आहे. कर्नाटकच्या दिशेने असलेल्या शेतासाठी पाण्याचा उपसा सातत्याने सुरू आहे. कर्नाटक हद्दीत पाणी साठवून ठेवले तर त्याचा सातत्याने उपसा होतो. त्यामुळे हे पाणी टाकळीच्या दिशेने सोडण्यात आले आहे. परिणामी बंधाऱ्याचे एका बाजूचे पात्र पूर्ण कोरडे आहे. या पात्रात शेळ्या बिनधास्त फिरत आहेत. बंधाऱ्यात असलेल्या मोटार उघड्या पडल्या आहेत. 

दरम्यान, उजनी धरणातून पाणी सोडण्याचे पत्र आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात नमूद असे की औज बंधाऱ्यात 0.05 मीटर इतकेच पाणी शिल्लक आहे. टाकळी इंटकवेलच्या पाण्याची पातळी नऊ फूट आहे. हा पाणीसाठा 20 ते 22 जानेवारीपर्यंत पुरेल असे अपेक्षित आहे. मात्र, सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रा 31 जानेवारीपर्यंत असणार आहे. त्यामुळे शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू शकते. या कालावधीत पाणी न सोडल्यास प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. तसेच शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍नही निर्माण होऊ शकतो. यात्रा काळात पाणीटंचाई उद्‌भवू नये आणि शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये यासाठी धरणातून तातडीने पाणी सोडावे, असे या पत्रात नमूद केले आहे. 


समांतर जलवाहिनीच्या निविदेला मुदतवाढ 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत टाकण्यात येणाऱ्या उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीची निविदा 16 जानेवारीला उघडण्यात येणार आहे. समांतर जलवाहिनीची निविदा काढण्यात आली होती. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली असून 14 जानेवारीपर्यंत निविदा दाखल करता येईल. 15 जानेवारीला सुटी असल्याने 16 जानेवारीला निविदा उघडण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com