उडाण योजनेची सोलापूरला प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

सोलापूर - देशातील सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात विमान प्रवासाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने एप्रिल २०१७ मध्ये उडाण योजना सुरू झाली. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील नांदेड, जळगाव, नाशिक, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश केला. मात्र, सोलापूरला अद्यापही ही योजना सुरू झाली नाही, तर दुसरीकडे जळगाव व कोल्हापूरची सेवा बंद केली.

राज्यातील लहान शहरांना जोडण्यासाठी व अडीच हजारांत विमानातून प्रवास करता यावा, या हेतूने ऑक्‍टोबर २०१६ मध्ये उडाण योजनेची (उडे देश का आम नागरिक) घोषणा केली. त्यानुसार एप्रिल २०१७ मध्ये दिल्ली ते कलकत्ता पहिली विमानसेवा सुरू झाली. या योजनेनुसार सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला. डिसेंबर २०२० पर्यंत राज्यातील सर्वच विमानतळांचा या योजनेंतर्गत विकास होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये डिसेंबर २०१८ पर्यंत ७ विमानतळांचा समावेश आणि ४३ शहरांना जोडणे आवश्‍यक होते. मात्र, सद्यःस्थितीत दोनच जिल्ह्यात उडाणची विमानसेवा सुरू आहे. 

प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने जळगाव आणि कोल्हापूरची उडाण सेवा बंद केली आहे. सोलापूरच्या विमानतळाच्या अडथळ्यांचा वाद सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्याठिकाणी ही योजना अद्यापही कार्यान्वित झाली नाही. पुढील टप्प्यात कोल्हापूरहून अन्य मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.
- सुरेश काकाणी,  व्यवस्थापकीय संचालक, विमानतळ विकास प्राधिकरण

Web Title: Solapur Waiting for flying plans